HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती

मुंबई | महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे १९८८ बॅचे आयपीएस अधिकारी आहे. शेठ हे मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या वेळी त्यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. महासंचालक पदाच्या रेसमध्ये पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, रजनीश सेठ आणि के व्यंकटेशम होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही देखील सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. 

याआधी संजय पांडे यांच्याकडे  पोलीस  महासंचालक पदाची तात्पुरती जबाबदारी दिली होती. पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांना एप्रिल २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी दिली होती. परंतु, पांडेंना महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका ॲड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले होते. येत्या  पाच दिवसात महासंचालक पदासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला सांगितले होते. यानंतर आज (१८ फेब्रुवारी) महासंचालक पदी राजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

रजनीश शेठ यांचा अल्पपरिचय

रजनीश शेठ यांचा जन्म २९ डिसेंबर १९६३ रोजी झाला. रजनीश शेठ यांचे शिक्षण बी ए ऑनर्स (एल एल बी) झाले आहे. रजनीश शेठ हे १९८८ बॅचे आयपीएस अधिकारी आहे. शेठ हे मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या वेळी त्यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही देखील सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. शेठ यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ जण कोरोनामुक्त

News Desk

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत – नाना पटोले

News Desk

ठाणे स्थानकात फुकट्याकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली

News Desk