HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टींचा ‘आक्रोश मोर्चा’!

कोल्हापूर | पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजू शेट्टी यांचं मोर्चा आज(२३ ऑगस्ट) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसतं. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केलीय. तसंच पूर आला म्हणून सरकारी नोकरदारांचे पगार थांबले का? तुम्ही आम्हाला नाराज केलं, अपेक्षाभंग केला, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक

अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे. जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी यावेळी केलीय. पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे,पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्यानं फी कशी भरायची? असा सवाल यावेळी शेट्टींनी विचारलाय. शेतकऱ्यांना 2019 साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही यावेळी शेट्टींनी केली आहे.

रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही?

महापुराचं एक कारण अलमट्टीही आहे. तज्ज्ञ कितीही नाही म्हणत असले तरी आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं व्यवहारिक उपाय करा. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारलाय. तर दिल्लीत बसून सोयाबीन आयात करायचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना निम्मा तोटा झाला, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे 23 ऑगस्टपर्यंत सरकारनं नुकसान भरपाईचं धोरण ठरवावं, अन्यथा पुढचा निर्णय मोर्चावेळी जाहीर करु, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर, विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk

‘सारथी’च्या माध्यमातून तरूणांच्या सर्वांगीण विकासाला मिळेल चालना! – मुख्यमंत्री

Aprna

सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरे उघडावीत आम्ही २ तारखेला मशिदी उघडू , इम्तियाज जलील यांचे सरकारला अल्टिमेटम

News Desk