HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी

कोल्हापूर |  शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या झालेल्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बंद होतं.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.. ही विधेयके मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली आहे. मात्र या मागण्याचा विचार न करता केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज व आश्रुधुरा बळाचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा म्रुत्यु झाला, अन्य शेतकरी जखमी झाले आहे. त्याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांचा समर्थनार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी अडवले असता मोठी झटापट उडाली. मात्र याला न जुमानता केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी शेट्टी म्हणले, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जात आणि प्रांतवाद देण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण देश केंद्राच्या विरोधात पेटवुन सोडल्याशिवाय ठेवणार नाही, असा इशारा यावेळी दिला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निगडित आहे. तो न्याय मागत असताना शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे. असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. तुम्ही जातीवादाचा मुद्दा बाहेर काढत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही, दोन दिवसात दिल्लीतील शेतकऱ्यांशी केंद्र सरकारने चर्चा करून तोडगा न काढल्यास संपूर्ण देश पेटवल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आमची हायात पोलिसांच्या विरोधात लढण्यासाठी गेली आहे. असे देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

Related posts

अर्णब गोस्वामींना कोठडी होण्यासाठी पोलिसांनी कोर्टात मांडले युक्तीवाद

News Desk

शिवराज सिंह चौहान यांच्या काळात दोन हजार कोटींचा घोटाळा !

News Desk

अरविंद केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

अपर्णा गोतपागर