HW News Marathi
महाराष्ट्र

Raju Shetty HW Exclusive : १५ दिवसांनी भाजीपाल्याची टंचाई होईल !

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कार्यकाळा ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढविलेल्या संकटावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीला आज (१३ एप्रिल) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तररित्या सांगितले आहे.

कोरोनानंतर राज्यातील शेतकरी कसा उभा राहिल याप्रश्नावर बोलतातना राजू शेट्टी म्हणाले की, “यावर्षी निसर्ग देखील शतकऱ्यांच्या हात धवून पाठी लागला आहे. आधी दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि आता कोरोना संकटाचा सामना शेतकरी करत आहे. शेतातील पिकांची कापणीसाठी मंजूर मिळत नाही. शेतमाल ने आण करण्यासाठी वाहने मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे हातावर पोट असल्यामुळे त्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. फळ, भाजीपाल आणि फुले उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, त्यांना झालेले नुकसान हे मोठे आहे, अशीही गोष्टी राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले.

सध्या लॉकडाऊमुळे राज्यातील ५० टक्के सरकरी कर्मचारी आणि शाळेतील शिक्षक घरी आहे. त्यांना अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांची मजमाप करून त्यांच्या नोंदणी करून घेतल्या पाहिजे. आणि या संकटातून बाहेर पडल्यानंतर या शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही केली पाहिजे, अशी अपेक्षा राजू शेट्टी एच.डब्ल्यूशी बोलताना व्यक्त केली आहे. सरकारने जर आर्थिक मदत नाही केली तर हे शेतकरी कधीच उभे राहू शकणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

येत्या १५ दिवसात भाजीपाल्याची टंचाई भासेल

येत्या १५ दिवसात भाजीपाल्याची टंचाई भासेल होईल, अशी भीती राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. कारण शेतकरी त्यांच्या भाजीपाल्यावर नागर फिरवीत आहे. आधीच्या पिकांना भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी जर येणाऱ्या पिकांची मशागत केली नाही. त्या पिकांकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. तर लॉकडाऊन हा किती दिवस असणार हे देखील माहिती नाही. यामुळे पुढी १५ दिवसानंतर तुम्हाला भाजीपाला मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी शेतकडी दुर्लक्ष दुलक्ष करून नये, हे सरकराने सांगावे लागे नाहीत तर खूप मोठे नुकसान आणि संकलान आपल्याला सामना करावा लागेल, असे राजू शेट्टी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री हे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. पण आभाळ फाटलेय..कुठे कुठे ठिगळे लावणार, ते दोघे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असे म्हणत राजू शेट्टी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेत क्षेत्राकडे देखील लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मेल आणि पत्राद्वारे कळविल्याचे राजू शेट्टींनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना देखील विमाचे सुरक्षा कवच हवे

कोरोनाची लढणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच विमा सुरक्षा कवच म्हणून दिल्याची घोषणा केली आहे. जर शेतकरी आणि त्यांच्या शेत मंजूर यांना जर हे विमा सुरक्ष कवच दिले तसेच शेतकऱ्यांना दिली असते तर आज आमचा शेतकरी ताकदीने लढला असता, अशी खंत राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना धीर दिला

सध्याची परिस्थिती गंभीर आहे परंतु याच्यापेक्षा कठीण परिस्थितीतू आपण बाहेर पडलेलो आहोत, खाबरू नका आणि धीर सोडू नका, शेतकऱ्यांना राजू शेट्टींनी विश्वस दिला आहे. देशाच्या संपत्तीमध्ये भर टाकण्याचे काम आपलाच करायचे आहे. त्यासाठी आपल्याला सक्षम राहण्याची गरज आहे. आणि आपण पुन्हा देश उभा करणार आहोत, त्यामुळे आपण धीर सोडू नका, लढाईला आपण कधीच घाबरत नाही. लढाईमध्ये अपयश दिसत असताना देखील आपण कधी पळ काढलेला नाही. आणि काढईचा देखील नाही शेवटपर्यंत आपण लढाईचे हे फक्त लक्षात ठेवा, असा विश्वास राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला आहे.

संपूर्ण मुलाखत

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक, लवकर निर्णय घ्या अन्यथा संघर्ष अटळ!

News Desk

राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे, नारायण राणेंचा आरोप

News Desk

बंडातात्या कराडकर ‘गनिमी काव्याने’ पंढपूरला जाणार, पोलीस झाले सतर्क

News Desk