HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम पुढे आले

 

मुंबई | पवईच्या हिरानंदानीजवळ भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घेतली आहे. ज्या पोलिसांना मारहाण झाली त्यांच्यासाठी नाही तर ज्यांनी मारहाण केली त्या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम पुढे आले आहेत. पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडा, अशी विनंती करणारा फोन भाजपचे नेते आणि आमदार राम कदमांनी पोलीस कर्मचाऱ्याला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणात कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी राम कदम यांनी थेट पोलिसांना विनंती करणारा फोन केल्याचं समोर आले आहे. राम कदम फोनमध्ये पोलिसांना म्हणतात, ”त्या दिपूने केलं ते ते चूकच आहे. त्याचं समर्थन करू शकत नाही. पण आता ज्या पद्धतीचे कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा”, अशी विनंती राम कदम यांनी केली. त्यामुळे राम कदमांवर आता चहूबाजूंनी टीका केलीय जात आहे.

काय आहे प्रकरण?

पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला ट्रिपल सीट हे कार्यकर्ते जात असताना धडकले होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना नितीन खैरमोडे या कॉन्स्टेबलला त्या आरोपींनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले होते.

Related posts

मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसह नगरसेवकांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक

News Desk

पाईपलाईन फुटली , दोन मुलांचा मृत्यू

News Desk

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार | अमित देशमुख

News Desk