HW News Marathi
महाराष्ट्र

राम कदम अर्णब गोस्वामी यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, अलिबाग कोर्टाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान, भाजप नेते राम कदम आज (५ नोव्हेंबर) सकाळी १०.१५ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

राज्यपालांची भेट घेऊन अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ९ पोलिसांना तातडीने सस्पेंड करण्याची मागणी राम कदम राज्यपालांकडे करणार आहे. तसेच, त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी देखील राम कदम करणार आहेत. त्यामुळे आता राज्यपाल या प्रकरणात काय पाऊल उचलणार आणि भाजपची मागणी पूर्ण करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन!

News Desk

भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Aprna

बांधकाम कामगारांना ठाकरे सरकारने दिले आर्थिक पाठबळ

News Desk