HW News Marathi
महाराष्ट्र

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने

अहमदनगर | भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. राम शिंदे आणि रोहित पवार या यांच्यात राजकीय दृष्ट्या मतभेद असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याचं उत्तम जुळतं हे या लग्न समारंभाला रोहित पवारांच्या उपस्थितीने दिसून आलं. इतकचं नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांची यावेळी आमनेसामने भेट झाली. दोघांनी हसतमुखाने एकमेकांना नमस्कार केला होता

राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

कोण आहेत राम शिंदें यांचे जावई?

श्रीकांत खांडेकर यांनी बी.टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. श्रीकांत यांचा सत्कार माजी मत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळणार!

News Desk

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

Aprna