HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे – राम शिंदे

अहमदनगर | राज्यात सध्या दूध दरवाढीसाठी भाजपकडून आंदोलन केले जात आहे. याच दरम्यान,  राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. आज (१ ऑगस्ट) सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही’, असे राम शिंदे यांनी म्हटले.

तसेच, ‘हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही’, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

Related posts

अंधेरीमध्ये व्यावसायिक इमारतीला आग

अपर्णा गोतपागर

Dahi Handi | मुंबईत जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु

News Desk

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk