HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

गणेश विसर्जनानंतर महाविकसआघाडीचं विसर्जन होणार !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विरोधी पक्षातील काही जणांनी पार्थना लंबी रेस का घोडा म्हटलं तर काहींनी पवारांच्या घरातील हा प्रश्न आहे असे म्हटले.यात आता रिपाईचे रामदास आठवले यांनी आपले मत मांडले आहे

महाविकासआघाडीच्या भवितव्याशीच या घडामोडी जोडत आठवले यांनी एक भाकीत केले आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढे तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद आणि बंडाळींमुळं याचे थेट परिणाम हे महाविकासआघाडी सरकारवर होतील”, असे आठवले यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, “सध्याच्या सर्व घडामोडी पाहता महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय यंदाच्या वर्षी श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकासआघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल, असेन भाकीत आठवले यांनी केले आहे. त्यामुळे रामदास आठवले यांचे हे भाकीत खरे ठरणार का? खरच आघाडी सरकारचे विसर्जन होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे

Related posts

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरोधात दुसरी FIR दाखल

News Desk

श्री रामाला साकारणार शिल्पकार राम सुतार

News Desk

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे !  मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

News Desk