HW News Marathi
महाराष्ट्र

आठवलेंची खडसेंना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर 

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. आज (७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेणार अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. खडसे राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे. आपण आपले सरकार आणूया असं आवाहन रामदास आठवलेंनी खडसेंना केलं आहे. दरम्यान, खडसेंना राष्ट्रवादीतच जायचं असेल तर त्यांनी आधी जायला हवं होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. परंतू आता राष्ट्रवादीत आता सगळं फुल असल्याचं आठवले म्हणाले होते. त्यामूळे खडसे भाजप सोडून कोणत्या पक्षात जाणार का? आठवलेंची ऑफर स्वीकारणार का? यावरही चर्चा सुरु झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग; मलिक म्हणाले, व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवा…..

News Desk

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही! – जयंत पाटील

Aprna

भाजपकडून राज्यपालांची भेट घेण्याचं सत्र सुरूचं ! आमदार ,खासदारांची घेतली राज्यपालांची भेट

Arati More