HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, आठवलेंचा दावा 

औरंगाबाद | रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदावरुन भाष्य केले आहे. “युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. मात्र, शिवसेना युपीएचा घटक नाही. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे.काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार आहे”, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य केलं

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसवर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

“दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात फक्त पंजाबचे शेतकरी आहेत. इतर राज्यातील फक्त संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. दुसऱ्या राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. शेतकऱ्यांनी तडजोड केली पाहिजे आम्ही सुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात तडजोड केली. कृषी कायदे मागे घेतले तर संसद आणि संविधानाला महत्त्व राहणार नाही. शेतकऱ्यांनी २०२० मधील आंदोलन २०२१ मध्ये नेऊ नये”, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व विरोधकांची बैठक घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण शरद पवार यांनी कृषी कायद्यात काय सुधारणा करायच्या याच्या सूचना केल्या पाहिजेत आणि संवाद साधला पाहिजे. उद्योगपती अदानी-अंबानी यांना उद्योग करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यांनाच माल विकला पाहिजे असं काही नाही, त्यांच्यासाठी हा कायदा नाही”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा माईक काढला,अभिरूप अधिवेशन गुंडाळले !

News Desk

‘मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल’,नाना पटोलेंचा मिश्किल टोला!

News Desk

बेळगाव पोटनिवडणुकीत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी राऊतांपाठोपाठ रुपाली चाकणकरही मैदानात!

News Desk