HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ रामदास आठवलेही मोदींना भेटणार 

नागपूर | राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाणही होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

रामदास आठवले आज (११ जून) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. येत्या 20 जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल. तसेच क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याबाबतही मोदींशी चर्चा करण्यात येणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश – आठवले

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आहे. श्रीमंत आहे. असं कोर्टाला वाटलं असावं. पण मराठा समाजात अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांना आरक्षण नाकारण्यात आलं आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. हे कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले आहे.

आघाडी सरकार दलित विरोधी, आठवलेंचा घणाघात

महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाबाबत घातकी भूमिका घ्यायला नको होती. हे सरकार दलित विरोधी आहे, असं सांगतानाच या सरकारमध्ये प्रचंड मतभेद आहेत. हे सरकार किती दिवस टीकेल हे सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत या सरकारकडून केंद्राकडे बोट दाखविलं जातं, असं ते म्हणाले.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर हे सरकारच अस्तित्वात आलं नसतं. भाजपसोबतच सरकार स्थापन झालं असतं. आताही शिवेसना आणि भाजपने अडीच अडीच वर्षे सरकार स्थापन करण्याचा विचार करावा. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं. मोदींजींसोबत उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला ठाकरे यांनी स्वीकारावा, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही वाघासोबत दोस्ती करायला हरकत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांनीही आता पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विमानतळाने रचला नवा विक्रम, २४ तासांत १००७ विमानांची उड्डाणे

News Desk

क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या कारचा भीषण अपघात; पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

Aprna

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna