HW News Marathi
Covid-19

रामदेवबाबांनी ‘ती’ चूक केली मान्य,अॅलोपॅथीला म्हणाले होते ‘मूर्ख विज्ञान’

नवी दिल्ली | कोरोना काळात जिवाची बाजी लावणारे डॉक्टर आणि अ‍ॅलोपॅथीबाबत योगगुरु रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. रामदेवबाबांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला होता. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. दरम्यान, अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून योगगुरू रामदेव यांनी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांच्या वक्तव्याचा डॉक्टरांनी तीव्र विरोध केला होता. करोना काळात डॉक्टर घेत असलेले मेहनत संपुर्ण देश पाहत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. हर्ष वर्धन यांच्या पत्राला उत्तर देताना रामदेवबाबा म्हणाले की, “हे प्रकरण शांत करायचं आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.”

रामदेवबाबा यांची एक व्हिडियो क्लिप समाजमाध्यमांवर फिरत आहे. तीत ‘‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे कोरोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले आहे. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले होते रामदेवबाबा?

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा विधानांचा समावेश असलेली एक व्हिडियो क्लिप वायरल झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेली संख्या जास्त

News Desk

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांना गुड न्यूज, सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार

News Desk

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांवर स्पष्टीकरण

News Desk