HW Marathi
महाराष्ट्र

राणे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार

मुंबई: काँगेसमध्ये असंतुष्ट असलेले विधान परिषद सदस्य नारायण राणे 27 ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळते. 27 ऑगस्ट ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीतच हा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाला राणे यांचा उपयोग होणार आहे. कोकणात देवगड वगळता अन्यत्र भाजपची मुळीच शक्ती नाही. तसेच सत्तेत राहून आरोप प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपाला राणेंसारख्याच खमक्या नेत्याची गरज आहे.
दरम्यान, राणे यांना मंत्रिमंडळात कोणतं पद देणार आणि त्यासाठी कुणाला हटविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण राणे हे महत्वाचे पद दिल्याविना स्वस्थ बसणारे नेते नाहीत. त्यामुळे त्यांना संतुष्ट करण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे.

Related posts

वाघिची गुरु शिष्याची जयंती राष्ट्रीय एकात्मेतेचं प्रतीक

News Desk

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk

स्थलांतरित मजूर अन् विद्यार्थ्यांचा स्वगृही जाण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk