HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंचे कट्टर विरोधक सरसावणार राणेंच्या स्वागताला

मुंबई – सिंधुदूर्गमध्ये राणें विरूद्ध सारे असेच चित्र राहिले आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांना टोकाचा विरोध करणारे त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार चक्क राणेंचेच स्वागत करणार आहेत. राणेंनी काँग्रेस सोडली त्याच वेळी शत्रुत्व संपले असे जठार यांनी स्पष्ट केले. शिवाय राणे हे मंत्री झाले तर सिंधुदूर्गात त्यांचे स्वागत करणारी पहिली व्यक्ती आपणच असू असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

राणे यांचा स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर कोणतीही कटूता रहाणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी राणेंचे कौतूक करताना जठार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेमुळेच सिंधुदूर्गचा विकासाला खिळ बसली असल्याचा आरोप त्यांनी केला. याला पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. जठार यांचा रोख बघता पुढच्या काळात स्वाभिमान पक्ष आणि भाजप हे शिवसेनेला जिल्ह्यात जेरीला आणण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस होती, पण आता काय हाल चाललेत तुम्हीच बघा”, पटोलेंचा पंकजा मुंडेंना टोला

News Desk

विठुमाऊलीप्रमाणे लालपरीसुद्धा भाविकांच्या ह्रदयात आहे, सतेज पाटलांचं भाजपला प्रत्युत्तर !

News Desk

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

swarit