HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.आज (११ नोव्हेंबर) सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सहकार क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारे शिवसेनेचे युवा नेते रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

रणजितसिंह देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळ दौऱ्याचं योग्यरित्या त्यांनी नियोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडत रणजितसिंह देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माण-खटाव यासारख्या दुष्काळी भागात जवळपास ७० चारा छावण्या सुरू करून त्यांनी मोठा दिलासा दिला होता. मात्र काँग्रेसच्या विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत पाऊल टिकले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कोणत्याच राजकीय पक्षात सक्रीय नव्हते. अखेर त्यांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. रणजित देशमुख यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्य आम्हाला देऊन टाका आम्ही वेटींगवरच आहोत”, नारायण राणेंचं सूचक विधान

News Desk

मुंबईतून हुसकवलेले फेरीवाले कल्याण डोंबिवलीत

News Desk

गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Gauri Tilekar