HW News Marathi
देश / विदेश

भाजपा महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलावर रावसाहेब दानवे म्हणाले…..

नवी दिल्ली। केंद्रीय रेल मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी काल(९ ऑगस्ट) भाजप खासदारांची महत्वाची बैठक पार पडली. भाजप मध्ये सध्या नवीन प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा रंगात आहे. यावर आता रावसाहेब दानवेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवरून देखील आता चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या वाढत्या भेटींमागचं कारण काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

भेटीचं कारण काय?

रावसाहेब दानवे यांनी भाजप बैठकीवर आपलं मौन सोडलं आहे. “केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना या मंत्र्यांचं स्वागत करायचं होतं. इतर खासदारांनाही बैठकीचं आमंत्रण होतं. एकत्र बसून जेवण्याच्या हेतूने आम्ही सर्व भेटलो होतो. या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं दानवे यांनी सांगितलं आहे . पुढे बोलताना त्यांनी प्रदेशाध्यशांसंदर्भातील चर्चांवर उत्तर दिलं. “त्या बातम्या चुकीच्या आहेत. आमचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चांगलं काम करत आहेत. आम्ही निवडणूक हारलेलो नाहीत. चंद्रकांत पाटील हेच आमचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष राहतील,” असं दानवे यांनी महाराष्ट्र भाजपामधील मोठ्या फेरबदलांसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे.

भाजपची खलबतं सुरु

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच चंद्रकांत पाटीलही शनिवारपासून दिल्लीत आहेत. रविवारी पाटील त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजपा काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजपा समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो, असं पाटील म्हणाले होते. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपामध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी

News Desk

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक

News Desk

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

News Desk