HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील परळी वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला RDX ने उडवण्याची धमकी

बीड । बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या परळी वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वीच धमकीचे पत्र आले होते. “५० लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर RDXने उडवून टाकू”, अशी धमकी दिल्यानंतर पुन्हा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र आले असून मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र देणारा कोण? पोलिसांनी लवकरात लवकर त्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे.
दोन दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला ५० लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. तसेच पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे. योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या नावाने आलेल्या पत्रामध्ये ५० लाख रुपये द्या. नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेजोगाई पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच तपासानंतर याबाबतचा स्पष्ट खुलासा आणि कारवाई होईल असं सांगण्यात येत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला पक्ष सोडायला भाग पाडू नका !

News Desk

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या पॅनेलने कुटासा गावात १० जागा राखल्या

News Desk

सुट्टी सिगारेट विकण्यावर राज्य सरकारची बंदी

News Desk