मुंबई | राज्यात आज (१४ ऑगस्ट) २४ तासांत आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १२ हजार ६०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ५ लाख ७२ हजार ७३४ वर पोहोचला आहे. तर याच एका दिवसांत ३६४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता १९ हजार ४२७ वर पोहचली आहे.
12,608 new #COVID19 cases, 10,484 recoveries & 364 deaths reported in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 5,72,734, including 1,51,555 active cases, 4,01,442 cured cases and 19,427 deaths till date: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/6fQ8N7EBey
— ANI (@ANI) August 14, 2020
दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज १० हजार ४८४ जण हे कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ लाख १ हजार ४४२ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे, राज्यभरात सद्यस्थितीत विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख ५१ हजार ५५५ इतकी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबतची अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.