HW News Marathi
महाराष्ट्र

हायपरलूपच्या स्वप्नाला ‘रेड सिग्नल’

पुणे | पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे हायपर लूप तंत्रज्ञानाने जोडल्यास अवघ्या १४ मिनिटांमध्ये प्रवास होऊ शकणारा हा स्वप्नवत प्रकल्प असून, त्याला आता रेड सिग्नल लागला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रद्द करण्याचे संकेत पवार यांनी शुक्रवारी दिले.

‘हायपर लूप हा प्रकल्प जगात कोठेही झालेला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ दे. पुणे-मुंबई या मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प परवडणारा नाही,’ असे वक्तव्य करत पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे हायपर लूप तंत्रज्ञानाने जोडल्यास अवघ्या १४ मिनिटांमध्ये प्रवास होऊ शकणारा हा स्वप्नवत प्रकल्प असून, तो रद्द करण्याचे संकेत पवार यांनी शुक्रवारी दिले.

‘पुणे-मुंबई घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा उपलब्ध झाल्यावर वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे. त्यामुळे हायपर लूप प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार आहे,’ असेही पवार म्हणाले. या प्रल्पासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सूचित करत या प्रकल्पाची ट्रायल घेण्याचीही आपली आर्थिक क्षमता नाही, या शब्दांत देशाच्या आर्थिक अवस्थेची स्पष्टपणे मांडणी केली आहे.

वारकऱ्यांना विकासनिधीतून करणार मदत

भंडारा डोंगर, आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. त्यांच्या निधीमध्ये भर टाकली जाणार असून आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. तसेच दिवे घाटात हा मार्ग चारपदरी करत वारकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. ‘रायगड रोप वेने गडावर गेलेले पर्यटक त्याच रोप वेने खाली येत असतात. मात्र, शिवनेरीच्या माथ्यावर जन्मस्थान असून, निम्मा किल्ला मध्यावर आहे. त्यामुळे पर्यटकांना चालत खाली यावे लागते. शिवनेरी रोप वेबाबत व्यवहार्य प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार केला जाईल.’ असे स्पष्टीकरण शिवनेरी रोप वे बाबत अजित पवार यांनी दिले.

हायपरलूपचे तीन मार्ग कोणते होते

पहिला मार्ग हा पुणे ते नवी मुंबई, ट्रान्सहार्बर लिंक, शिवडी, दादर असा आहे. दुसरा मार्ग पुणे ने नवी मुंबई, वाशी, दादर असा प्रस्तावित केला आहे. तिसरा मार्ग पुणे ते वाशी, सांताक्रूज, कुर्ला, दादर असे तीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

News Desk

काँग्रेसच्या चार मंत्र्यांनी केला अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाचा दौरा

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी केले ट्विट

swarit