HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठया प्रमाणात वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यात आज (१९ एप्रिल) झालेली नव्या कोरोनारुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस राज्यातील हा आकडा सातत्याने ६० हजारांच्या पार जात होता. त्यामुळे, आज ह्या रुग्णसंख्येत झालेली घट काहीशी दिलासादायक आहे.

राज्यात आजच्या आकडेवारीनुसार चिंताजनक बाब अशी की, आज राज्यात ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर राज्याचा मृत्यूदर सध्या १.५६ टक्के इतका आहे. तर दुसरीकडे राज्यात आज ५२ हजार ४१२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडणे हे सध्या राज्यपुढचे मोठे आव्हान आहे.

राज्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र, या नियमांचे काटेकोर पालन होत नसून रुग्णसंख्याही वाढते आहे. त्यामुळे, आता राज्यात कडक लॉकडाउन लावला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले आहेत.

Related posts

युएपीए विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk

लालू प्रसाद यादव अखेर शरण

अपर्णा गोतपागर

धक्कादायक ! मुंबईमध्ये ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण