HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे !

मुंबई | कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक उपाययोजनांच्या अनुषंगाने आज (२२ मे) आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, धार्मिक नेते आदींबरोबर युनिसेफच्या सहकार्याने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे. कोरोनासंदर्भात लोकांमध्ये भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. त्यामुळे लागण झालेले अनेक रुग्ण शेवटच्या क्षणाला उपचारासाठी दवाखान्यात येतात. लोकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजेश टोपे आणि नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही सोबत राहू, अशी ग्वाही असा विश्वासही या सर्व धर्मगुरूंनी व उपस्थित व्यक्तींनी दिला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले की, “लोकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भिती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे अजुनही अनेक लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत असे लक्षात आले आहे. अनेक जण लक्षणे दिसूनही ती लपवून ठेवत आहेत. अशा वेळी या व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे कोरोनासंदर्भातील मनातील भिती दूर करुन लोकांनी तपासणीसाठी पुढे आले पाहिजे. धार्मिक नेते, संस्थांनी याबाबत लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १०० कोरोना रुग्णांपैकी ९७ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे”, असेही ते म्हणाले.

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी युनिसेफमार्फत आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “कोरोनाविषयी लोकांच्या मनामध्ये आजही मोठी भिती आणि गैरसमज आहेत. अनेकजण लक्षणे दिसूनसुद्धा उपचारासाठी पुढे येत नाहीत. लोकांच्या मनातील ही भिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक संस्था आणि धार्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कौशल्य विकास विभागाने राज्यातील अनेक तरुणांना विविध प्रकारची कौशल्यविषयक प्रशिक्षणे दिली आहेत. आता राज्यात उद्योगांमध्ये या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा विभाग यापुढील काळात मोठे कार्य करेल, असे त्यांनी सांगितले. सर्व धर्म समुहांनी मिळून कोरोनाचा मुकाबला करुन लवकरच आपण या संकटावर मात करु”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक

News Desk

साहेब मराठी शाळा वाचवा, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे ‘मातोश्री’बाहेर आंदोलन 

News Desk

छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदारासह ५ जवान शहीद

News Desk