मुंबई। एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या आडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करून पैसे कमावले जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने रेमेडिसिवीरसारख्या कोरोनाग्रस्तांना फायद्याचे असलेल्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा काल पर्दाफाश केला आहे. रेमेडिसिवीर किंवा टोसीलिझोमाब सारख्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आराम देणाऱ्या औषधांची किंमत सहा ते दहा पट वाढवून या औषधांचा काळा बाजार करणारी ही टोळी आहे.
गुन्हे शाखा कक्ष सातच्या मदतीने या टोळीतील ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून रेमेडिसिवीरच्या १३ बॉटल ही जमा करण्यात आल्या आहेत. सध्या याचा तपास गुन्हेशाखा करीत आहे. तर एफडीए देखील अशा प्रकारे कोरोनाच्या काळात औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर आता कडक कारवाई करीत आहेत.
Maharashtra: Food and Drug Administration (FDA) busted a racket involved in black marketing of Remdesivir last night in Mumbai. Seven persons have been arrested and 13 vials of Remdesivir have been seized so far. pic.twitter.com/Spx9yqFHwR
— ANI (@ANI) July 19, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.