HW News Marathi
Covid-19

राज्यात अजून काही दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार!

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, “आपल्याला लागणारं रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढं कमी मिळालेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.”

“नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता.

त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतू कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवलं आहे.” असंही डॉ.शिंगणे यांनी सांगितलं आहे.

“ही सर्व आकडेवारी पाहता व दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना आणि रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपण आपल्याला प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. १९-२० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे.” असं डॉ. शिंगणे म्हणाले आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी रेमडेसिवीर मिळण्यासाठी थांबावे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांमध्ये घाट, २४ तासात ४३ हजार ३९३ नवीन कोरोनाबाधित

News Desk

मुंबईत होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी!

News Desk

फार्मा कंपनीच्या मालकासाठी फडणवीस थेट पोलिस ठाण्यात का गेले ? काय आहे कारण ?

News Desk