ठाणे। मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी कळवामधील घोलाईनगर परिसरात घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या सोबत भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे उपस्थित होते. त्यानंतर दरेकर हे कळवा येथील दरड दुर्घनेत मृत्य कुटुंबियाचे नातेवाईक आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. pic.twitter.com/GvleZvlfuR
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 20, 2021
प्रवीण दरेकर म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अगदी निरागस बालिका जखमी झाली आहे. तिच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची पुसट कल्पना देखील तिला कल्पना नाही. ही मन हेलवणारी घटना आहे. मुंबईत विक्रोळी, चेंबूर, भांडुपला आशा घटना घडल्या. त्याला भूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय. ज्या ठिकाणी आशा घटना घडल्या आहेत, तिथल्या संबंधित अधिकारी कोण होते? त्यांनी परवानगी होती का? याची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या दुर्घटनांचा आपण आणि देवेंद्र फडणवीस निश्चित पाठपुरावा करु असं आश्वासनही दरेकर यांनी यावेळी केलंय. अशा प्रकारच्या प्रवृत्ती ठेचल्या नाहीत तर अशा घटना घडतच राहतील. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दरेकर यांनी केलीय.
नेमकं काय घडलं?
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी पाऊस वैरी होऊन कोसळला. या मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झालं. ज्या नागरिकांनी ही घटना पाहिली त्यांच्यासाठी हा थरार शब्दांमध्ये सांगण अशक्य आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं आहे. पण आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.