HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरु, त्यामुळे… ! केंद्रीय मंत्रालयाचा इशारा

नवी दिल्ली | “प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे, मार्गदर्शक सुचनांनुसारच प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जावा. अन्यथा संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असा स्पष्ट इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज (२८ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत प्लाझ्मा थेरपीच्या कोरोना रुग्णांवरील वापराबाबत काही सूचना करण्यात आल्या आहे. विशेषतः कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी प्लास्मा थेरपी प्रामुख्याने वापरली जाते. मात्र, अद्याप त्याचा फायदा खरंच होतो का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण जगभराला सध्या कोरोनाचा विळखा आहे. मात्र, सद्यस्थितीत आपल्याकडे कोरोनावरचे कोणतेही उपचार, लस उपलब्ध नसल्याने आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यात आता कोरोनावर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याची चर्चा होती. म्हणूनच देशात प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी देखील मिळवण्यात आली. दरम्यान, सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीचा उपचार करण्यात आला. चीनमध्ये ५ कोरोना रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण पुढच्या १२ दिवसांत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हटले जात आहे. तर कोरोनाचे रुग्ण या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असल्याचा दावा अमेरिकन जर्नलमध्ये देखील करण्यात आला आहे. मात्र, ही थेरपी कोरोनारुग्णवर खरंच कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर ठरते का ? याबाबत वैद्यकीय क्षेत्रात अनेक मतमतांतरे आहेत.

Related posts

‘कोरोना’च्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार !

अपर्णा गोतपागर

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकाराची हत्या

News Desk

युवतींनो लढायाला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे

अपर्णा गोतपागर