HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह ४ सदस्यांनी दिले राजीनामे !

बीड | खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर, गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात, भाजप पदाधिकाऱ्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांकडून, राजीनामासत्र सुरू झालं आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, या राजीनामा सत्राला सुरुवात झालीय. काल एकाच दिवशी तब्बल 47 राजीनामे देण्यात आले होते. तर आज तिसऱ्या दिवशी देखील हे राजीनामासत्र सुरू आहे.

आज (११ जुलै) केजच्या पंचायत समिती सभापती परीमला विश्वनाथ घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य सुलाबाई सदाशिव सरवदे, अनिता भगवान केदार आणि तानाजी पांडुरंग जोगदंड यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजीनामा सत्रानंतर, आज भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असून आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NEET परीक्षेचा आज निकाल, जाणून घ्या कुठे पाहाल..

News Desk

जाणून घ्या…संभाजी महाराजांबद्दलच्या काही अज्ञात, पण रंजक गोष्टी

News Desk

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ 50 हजार रुपये देणार; मंत्रिंडळाचा निर्णय

Aprna