HW News Marathi
Covid-19

पुण्यात १७ मेनंतर ३ टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम | पालिका आयुक्त

पुणे | देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांना चौथ्या लॉकाडऊनची संकेत दिले. मात्र, हे लॉकडाऊन थोडे वेगळे असेल असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून मुंबई आणि पुण्यात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील ३ टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहतील आणि ९७ टक्के भागात जास्त सुविधा मिळणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

तसेच कंटेनमेंट झोन हा छोटा आणि मर्यादित केलेला असून या परिसरातील तिथे सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता काही उघडले जाण्याची आणि शिथिलता करण्याची शक्यता फार कमी असल्याचे आयुक्तांनी म्हणाले. तसेच शहरातील शहरात मात्र अधिकाधिक दुकाने आणि व्यापारी आस्थापने उघडले जातील. खाजगी व्यवस्था, व्यापारी आस्थापने सरकारी कार्यालय १०० टक्के सुरु करणे आणि सर्व प्रकारचे उद्योगधंदे सुरु करण्याचा विचार आहे. या महत्त्वाच्या तीन गोष्टींवर सरकारचे आदेश अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकाचा कॉन्टॅएक्ट ट्रेसिंगवर भर

News Desk

रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ, रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली

News Desk

कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

News Desk