मुंबई | सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी रिया चक्रवर्ती मुंबईतील ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी केली सुरू आहे. ईडीने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज (७ ऑगस्ट) रियाची चौकशी होत सुरु आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केली होती. मात्र, ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे रियाला ईडी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक होते.
रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी ईडीकडे विनंती केली होती की, सुप्रीम कोर्टात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत याप्रकरणी ईडीने रियाची चौकशी करू नये. परंतु, ईडीने रियाच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळला. १२ वाजता ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यासाठी रिया ईडी कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली आहे.
#SushantSinghRajput death case: Rhea Chakraborty arrives at Enforcement Directorate (ED) office in Mumbai.
ED rejected her earlier request that the recording of her statement be postponed till Supreme Court hearing. pic.twitter.com/MIWYlYMXhT
— ANI (@ANI) August 7, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.