HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्ण संख्या, लस वितरण मुद्यावर पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. ही बैठक दोन टप्प्यात पार पडणार आहे. यात एका टप्प्यात मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा करतील. तर दुसऱ्या टप्प्यात सर्व राज्यात कोरोना लसीच्या वितरणाची तयारी यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीवर देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात ज्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, ते मुख्यमंत्री सहभागी होतील. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्तनपान करणाऱ्या महिलाही कोरोना लस घेऊ शकतात? काय आहेत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स…

News Desk

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

News Desk

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

News Desk