HW News Marathi
महाराष्ट्र

राम शिंदेंच्या चौंडी गावात रोहित पवारांच्या पॅनलने मारली  बाजी

कर्जत जामखेड | विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही रोहित पवार यांनी राम शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी या गावात रोहित पवारांच्या पॅनलने बाजी मारली आहे. चौंडीमध्ये रोहित पवारांच्या गटाला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जोरदार सामना रंगला होता. या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभेत धडक दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.

राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार गटाचा विजय झालाय. चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळालं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी मोठं लक्ष घातलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चला आपण एकत्र केंद्राकडे जाऊ”,अजित पवारांची फडणवीसांना साद

News Desk

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

News Desk

राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 120 जणांचा कोरोनाने घेतला बळी!

News Desk