HW News Marathi
महाराष्ट्र

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

भंडारा | भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास २च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे. रोहित पवार भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबीयांवर हे दुःख कोसळले त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही केले ट्विट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील अलर्ट… संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाशी घेतली बैठक!

News Desk

देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केला- नाना पटोले

News Desk

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

News Desk