HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजपचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडीमध्ये दुफळीचे चित्र दाखवत आहे – रोहित पवार

पुणे | महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार अंतर्गत वादातून पडणार असल्याचा दावा केला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचं सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटतं तशी परिस्थिती नाही, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात सिंचन भवन येथे आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचं चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही. त्यांच्या मनात कुठेतरी काही तरी व्हावं हेच आहे. मात्र सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो”, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

तसेच, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यासाठी यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार येत्या सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत, यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांविषयी सरकारने वेगवेगळ्या संघटनांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. देशात सर्व राज्यात सर्वात जास्त मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेतात. त्यामुळे सर्वांचा एकत्रित निर्णय घेण्याऐवजी राज्याचा वेगळा निर्णय घेणे अपेक्षित आहे.”

Related posts

तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट – सीबीआय

Gauri Tilekar

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

News Desk