HW News Marathi
महाराष्ट्र

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

मुंबई | मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे. लवकरच दाऊदवर कारवाई होईल, असं आश्वासनही पाकिस्तानने दिले आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवायांशी जोडल्या गेलेल्या ८८ नेते आणि दहशतवादी गटांशी जोडल्या गेलेल्या सदस्यांवर कारवाई केली आहे. या ८८ जणांची यादी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केली आहे. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि जकीउर रहमान लखवी यांच्या नावाचा समावेश आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे पाकिस्तानने पहिल्यांदाच मान्य केले आहे. कराचीशिवाय पाकिस्तानने दाऊद इब्राहिमचे तीन पत्ते जाहीर केले आहेत.

दरम्यान, याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विट करत एक मागणी केली आहे. दाऊदला भारतात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी रोहित पवारांनी मागणी केली आहे. मुंबईत झालेल्या बॉंम्बस्फोटाचा सुत्रधार पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचा दावा खरा ठरला आहे. पाकिस्तानने दाऊद तेथे असल्याचे कबुल केले आहे. आता कुठल्याही परिस्थितीत दाऊदला भारतात आणावे अशी विनंती ट्विटर द्वारे रोहित पवारांनी पंतप्रधानांना केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

News Desk

‘स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही’, अजित पवार म्हणाले…

News Desk