HW News Marathi
महाराष्ट्र

तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, रोहित पवारांनी दानवेंना सुनावले 

अहमदनगर | शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, असं म्हणत असाल, तर तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दानवेंना सुनावले आहे. ते कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते.

विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात, त्याला काही आधार नसतो, असा टोला दानवे यांना लगावला आहे. सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला. त्याचबरोबर शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत असतील, तर त्याला तुम्ही म्हणत असाल भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून येऊन या लोकांना प्रेरित करतात, तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देतात, अशी टीकासुद्धा रोहित पवारांनी केली आहे. तर याच्या आधी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी केलेले वक्तव्य लोक विसरले नाहीत आणि आताही ते वक्तव्य करतात की पाकिस्तान आणि चीन यांनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांची विचारसरणी त्याच लेव्हलची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

तर अशा विचारसरणीच्या लोकांना आम्ही राजकीय हेतूतून नाही, तर सर्वसामान्य लोक याला कसे उत्तर देतील हे तुम्हाला बघायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच अशा लोकांचे वक्तव्य जास्त मनाला लावून कुणीही घेऊ नये, असं माझ्यासारख्याला वाटतं. असं सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. बच्चू कडू यांनीही त्यांचं बोलण दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश!

News Desk

आपल्याला शिवसेना प्रमुखांना १०० आमदारांची तोफरुपी सलामी द्यायची आहे !

News Desk

“उदय सामंतांना माहितेय भाजपचं सरकार येणार म्हणून फडणवीसांकडे…”, निलेश राणेंनी पुन्हा फटकारलं

News Desk