HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत – रोहित पवार

मुंबई | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.

तसेच, रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाह टोला लगावला आहे. केवळ प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी रोहित पवार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत असल्याचे वक्तव्य मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर रोहित पवार यांनी, आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे ट्विट केले आहे.

 

अमित ठाकरेंनी काय केले होते ट्विट?

या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. मुंबईच्या आणि भावी पिढीसाठी गरजेच्या असलेल्या पर्यावरणाचे नुकसान होण्यापेक्षा कारशेडचे नुकसान झालेले परवडेल, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

News Desk

भाजपच्या मंत्र्याकडून बीफ खाण्याचं समर्थन!, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk

काँग्रेस पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा! – नाना पटोले

News Desk