मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल कौतुक केलं आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे.
तसेच, रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी जी-२० परिषदेत कोरोना विरुद्ध कृती करण्याच्या आवाहनावर देखील आनंद व्यक्त केला आहे. पण त्याच वेळी राज्यातील भाजप नेत्यांना देखील टोला लगावला. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी याबाबत विधान केलं आहे.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.