HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीच्या आमदार आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना कोरोनाची लागण

सांगली | प्रमुख महानगरांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आाहे. अशातच सांगली जिल्ह्यातील दोन आमदार आणि एका माजी आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

३ सप्टेंबरला आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि भाऊ सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, आर.आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या स्थितीत लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने लोकांमध्ये जावे लागत आहे. त्यातून अनेक लोकांशी संपर्क येत असल्याने बरीच काळजी घ्यावी लागत आहे. रोहित पाटील व सुरेश पाटील यांना देखील अशाच जनसंपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला केले कळकळीचं आवाहन  

News Desk

देशातील कोरोना रुग्ण संख्या घटली!

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४७, १९० वर

News Desk