HW News Marathi
महाराष्ट्र

सुजय विखेंनी विमानातून आणलेल्या बॉक्समध्ये काय होतं?

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्ण संख्या एकीकडे वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा, लसींचा तुटवजडा या सगळ्या गोष्टी होत असताना आमदार, खासदार आपापल्या गावांत, मतदारसंघात कोविड सेंटर उभारत आहेत तर कुठे रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत आहेत. अशात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी खास विमानाने नगरसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संशय व्यक्त केला आहे. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनेच होती ना? की आणखी काही होते? असा संशय रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही शंका उपस्थित केली आहे. खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, असं आव्हानच चाकणकर यांनी दिलं आहे. त्यामुळे सुजय यांनी आणलेल्या बॉक्समध्ये खरोखरच इंजेक्शन होते का? सुजय विखेंनी व्हायरल केलेला व्हिडीओ खरा होता का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

सुजय विखे काय म्हणाले?

“ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले होते. माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात मुसळधार!

News Desk

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब; फेक कॉल करणारा पोलिसांच्या ताब्यात

Aprna

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk