नवी दिल्ली | देशात कोरोनाचं संकट असताना नागरिकांना अजून एका संकटाला लोकांना तोंड द्यावं लागतंय ते म्हणजे इंधन महागाईचं. देशात काही आठवड्यांपासून सतत इंधनचे दर वाढत आहेत. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत” अशा शब्दांत पायलट यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त
इंधन वाढीमुळे मोदी सरकारला सगळेच बोल लावत आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही आता आपलं मत मांडलं आहे “सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यावर सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत” अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे.
As per the government’s own figures, the excise on petrol has increased by 250% while 800% on diesel in the last seven years which has got them a revenue of Rs 25 lakh crores. This is nothing but a direct attack on the pockets of common man,” he added.
— ANI (@ANI) July 17, 2021
6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या
“देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाही. फक्त पेट्रोलचाच विचार करायचा झाला, तर अनेक राज्यांमध्ये पेट्रलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे” असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. डेहराडूनमध्ये काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.