HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, विमानतळावर केलेला गरबा बरंच काही सांगतं”; सचिन सावंत

 

मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव

अदानीने आपलं कार्यालय अहमदाबादला हलवण्या प्रकरणी आता राजकीय चळवळींना उधाण आलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता याविषयी मत व्यक्त केलं आहे. “मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेलें.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

“महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही.” असा टोला देखील सचिन सावंत यांनी लगावलेला आहे.

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर गरबा

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचा ताबा मिळताच १७ जुलैला प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेल्या एका गरबाचा व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी मास्क घालून गुजरातचं पारंपारिक नृत्य गरबा करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. हर्ष गोयंका हे आरपीजी इंटरप्रायझेसचे चेअरमन आहेत.

अदानीने कार्यालय अहमदाबादला हलवले

मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

News Desk

कसाबने लपवलेला शस्त्रसाठा शोधून काढणारा ‘कॅनिंग सैनिक’ कालवश

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांवर, कोरोना रुग्णसंख्या वाढतीच!

News Desk