मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या ईडीचं सावंत आहे. अनिल देशमुखांची ४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबियांना पण समन्स पाठवण्यात आला होता, मात्र चौकशी साठी कोणीच उपस्थित राहिलं नाही. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच असल्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना आता काँग्रेसकडून देखील त्याला आव्हान दिलं जात आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर ईडीनं अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून ४ सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन सावंत यांनी ईडीला हे प्रश्न केले आहेत.
१.अनिल देशमुख यांच्या मालकीची उरणमधील एक जागा ईडीनं नुकतीच जप्त केली आहे. या जागेची किंमत ईडीकडून २ कोटी ६७ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तीच जागा ३०० कोटींची असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. “तुम्ही अजूनही माध्यमांमध्ये आलेली ३०० कोटींची किंमत खरी आहे असं सांगू शकता का? कारण उरणमधील तीच जागा २००५ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती असं तुम्हीच म्हणत आहात”, असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला आहे.
२. अनिल देशमुख यांच्या मालकीची उरणमधील एक जागा ईडीनं नुकतीच जप्त केली आहे. या जागेची किंमत ईडीकडून २ कोटी ६७ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तीच जागा ३०० कोटींची असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. “तुम्ही अजूनही माध्यमांमध्ये आलेली ३०० कोटींची किंमत खरी आहे असं सांगू शकता का? कारण उरणमधील तीच जागा २००५ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती असं तुम्हीच म्हणत आहात”, असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला आहे.
Demand answers from Enforcement Directorate-
1. Do you still confirm theories floated in Media of ₹300 crore land at Uran when now you only say that the land was purchased in 2005 and worth ₹2.67 crs?
2. Payment of flat was done in 2004 how can it be connected now to the case? pic.twitter.com/lc4TnyOEG1— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021
३. दरम्यान, ईडीनं जप्तीची कारवाई झाल्यानंतर जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात अनेक बारचालकांनी अनिल देशमुखांना ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर “तुम्ही जाहीर केलं की अनेक डान्स बार चालकांनी अनिल देशमुखांना सचिन वाझेंच्या माध्यमातून ४ कोटी ७० लाख रुपये दिले. मग त्या बारचालकांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?” असं आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी विचारलं आहे.
3. You declared that several dance bar owners gave money worth 4.70 crs to @AnilDeshmukhNCP ji through Waze. Why those bar owners are not behind bar yet?
4. What abt investigation of Parambir Singh who even after admitting knowledge of ₹100 crore demand, didn't take any action? pic.twitter.com/BwntVzzkYE— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021
४.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप केला होता. त्याची माहिती आपल्याला देण्यात आल्याचं देखील परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यावर “१०० कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती असून देखील त्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं?” असा देखील सवाल काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.