HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांतदादा ‘ही’भाजपची मराठा समाजाशी गद्दारी नाही का ?

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महत्वाचा झाला आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून आरोप केले जात आहेत.आजपासून भाजपच्या नेत्यांनी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात देखील केली आहे.दुसरीकडे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.आज ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

या सगळ्या परिस्थितीत मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपाकडूनच मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सचिन सांवत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भाजपा व संघाशी संबंधित असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून काही कागदपत्रे ट्विट करत सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे म्हटलं आहे आणि भाजप व चंद्रकात पाटील यांनी मराठा समाजाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे.

सचिन सांवत यांनी ट्विट केलय की , “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,”

“डॉ. अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे,” असं आव्हान सावंत यांनी दिलं आहे.

“भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या #SaveMeritSaveNation या संस्थेचे भाजपा व संघाचे नागपूर कनेक्शन आहे. भाजपा पदाधिकारी मराठा आरक्षणविरोधामध्ये न्यायालयीन लढाईत सहभागी होते,” असा आरोप सावंत यांनी भाजपवर केलाय.त्यामुळे भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशन संपेपर्यत सभागृहात उपस्थित रहा ! शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना व्हिप जारी

News Desk

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देणार!

News Desk

“आगे आगे देखो होता है क्या”, गिरीश महाजनांचे सूचक ट्विट

News Desk