HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी या गोष्टी केल्या सोप्या, काँग्रेसचा टोला

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला आहे. भाजप मराठा समाजाच्या मागे उभे आहेत. याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं. त्याचा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे.मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना मनकवड्या म्हटले आहे. यात मोदी, संभाजीराजे आणि मराठा आरक्षणाविषयी जे वक्तव्य केलं त्यावरुन सुनावले आहे.

काय आहे सचिन सावंत यांचे ट्विट?

मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत

१ मोदींची विषयांची समज फार कमी आहे.

२. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही.

३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk

MarathaReservation | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण

News Desk

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते 

News Desk