HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर तुम्ही शेतकऱ्यांचे विश्वासघाती राजे होता – सदाभाऊ खोत 

सांगली | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर सांगलीत बोलताना केली आहे.

”पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

पुढे खोत असंही म्हणाले आहेत की, शरद पवार तुम्ही खोटं बोलून जाऊ नका. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तुमचा इतिहास लिहिला जाईल, तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर तुम्ही शेतकऱ्यांचे विश्वासघाती आणि खोटारडे राजे होता, हा इतिहास तुमच्या बाबतीत महाराष्ट्रात लिहिला जाईल, अशी जहीर टीकादेखील पवारांवर केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. येत्या 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय योग्यच !

News Desk

डॉ शीतल आमटे- करजगी यांनी आमटे कुटुंबीयांवर केलेले आरोप आणि वाद काय आहे जाणून घ्या…

News Desk

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit