HW News Marathi
महाराष्ट्र

सदाभाऊ यांची हकालपट्टी

पुणे – फडणवीस सरकारमधील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी सोमवारी येथे केली.

तसेच ”सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. ”सदाभाऊ यांना सत्ता सुंदरीचा स्पर्श झाल्याने मोह सोडविला जात नाही”, अशी खोचक टीका स्वाभिमानी संघटनेचे प्रकाश फोफळे यांनी केली आहे. शिवाय, सरकारमध्ये राहण्याच्या निर्णयाबाबत आठवडाभरात कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.

प्रकरण काय ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी द्रोह केल्याचा ठपका सदाभाऊ खोत यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, चौकशी समितीला सामोरे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून फारकत घेण्याचे संकेत सदाभाऊ खोत यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

News Desk

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

News Desk