HW News Marathi
महाराष्ट्र

साकीनाका बलात्कार प्रकरण, रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार, RPIतर्फे 1 लाख रुपयांची मदत!

मुंबई। साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. या घटनेत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांची येत्या सोमवारी सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

पीडित महिलेच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या सोमवारी (20 सप्टेंबर) साकीनाका बलात्कार पिडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात अॅट्रॉसिटीचा कायदा लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी यापूर्वी केली होती. या प्रकरणात राज्य सरकारने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तर दुसरीकडे आता रिपब्लिकन पक्षातर्फेही पीडित महिलेच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

आरोपीने गुन्हा कबुल केला

साकीनाका बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. यामधील आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे. या आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच आरोपीने गुन्हा कबुल केला असून सर्व घटनेची त्याने माहिती दिली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यापूर्वी दिलेली आहे.

पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची मदत

साकीनाका बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर बलात्कार प्रकरणावर चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल .

News Desk

‘…आता ठिणगी पडली, आमच्या नादाला लागू नका’ संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा

News Desk

‘अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका!

News Desk