HW News Marathi
देश / विदेश

आरोग्यमंत्री झोपले आहेत का? – संभाजी ब्रिगेड

पुणे | सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांची झुंबड असताना त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरळीत केंद्रे मिळत नाहीत. महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक दृष्टया वेळोवेळी नुकसानीत टाकले जात आहे.आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीटामधील गैरप्रकार तसेच परीक्षा रद्द करण्यापासून सुरू झालेला सर्व गोंधळातील प्रवास आरोग्य विभागाच्या ढीसाळ कारभारामुळे आणि नियोजनामुळे आज परीक्षा केंद्रावर पेपर उशिरा सुरू झाल्याने परत गोंधळ उडाला. निष्क्रिय प्रशासन असतानासुद्धा आरोग्यमंत्री त्यावर कठोर पावले उचलत नाहीत.

आजच्या परीक्षेची उच्चस्तरीय चौकशी करून राज्याचे आरोग्य संचालक व परीक्षेचे मुख्य अधिकारी यांचे तात्काळ निलंबित करावे

आरोग्यमंत्री राजेश टोपे झोपलेत का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.राज्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सर्व विभागातील लाखो पदे रिक्त आहेत अशी परिस्थिती असताना देखील राज्य सरकार नोकर भरती करायला तयार नाही. अधिकाऱ्यांची पोट भरलेले असल्यामुळे गेंड्याची कातडी पांघरून सगळी लोकं कारभार करत आहेत. या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. मुलांच्या भविष्याशी कोणीही खेळू नये. आजच्या परीक्षेची उच्चस्तरीय चौकशी करून राज्याचे आरोग्य संचालक व परीक्षेचे मुख्य अधिकारी यांचे तात्काळ निलंबित करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

‘इतर परीक्षेचे वसूल केलेले पैसे विद्यार्थ्यांना तात्काळ परत मिळाले पाहिजेत.’ आजतर बरेच विद्यार्थी परीक्षेचे सेंटर इतर जिल्ह्यात आल्यामुळे अडचणीच्या काळात सुद्धा प्रवास खर्च करून पोहोचलेले असताना ऐनवेळी परीक्षा सुरू न होणे, एकाच विद्यार्थ्यांना सारख्या वेळेत दोन पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे हा आरोग्य विभागाचा आणि आरोग्य विभागाच्या हेकेखोर संचालक मा. अर्चना पाटील यांचा गलथान कारभार जबाबदार आहेअसंदेखील ते म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधी घेणार उद्धव ठाकरेंची भेट!

News Desk

दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवते विरोधात !

News Desk

पाकिस्तान पंतप्रधान मोदींना सहकार्य करत आहे !

News Desk