HW News Marathi
देश / विदेश

भाजपने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत ! चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे. या मुद्द्यावरून आता भाजप खासदार देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि संभाजीराजेंमध्येच वाद पेटताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी भाजपला घरचा आहेर देत “मी भाजपचा ठेका घेतलेला नाही” असे विधान केले होते. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना डिवचले आहे.”भाजपने पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत. संभाजीराजेंचा आम्ही केलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“अहमदाबादमध्ये संभाजीराजेंसाठी मोदींसह सर्वजण उभे राहीले. इतकेच काय तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असेही मोदींनी म्हटले होते”, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “मात्र भाजपने पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत”, अशी नाराजी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदींकडून भेटीसाठी वेळ मागितली होती. संभाजीराजेंनी ४ वेळा मोदींना याबाबतचे पत्र लिहिले होते. मात्र, तरीही मोदींनी आपल्याला भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजेंनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विरोधकांकडून देखील भाजपला लक्ष्य केले जाऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी भाजपची बाजू स्पष्ट करत संभाजीराजेंना डिवचले आहे.

भाजप आणि संभाजीराजेंमधला संघर्ष पेटणार?

चंद्रकांत पाटील पुढे संभाजीराजेंबाबत बोलताना म्हणाले कि, “संभाजीराजे यांनी व्यक्ती म्हणून काय करावे याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही. मराठा आरक्षणासाठी नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्षाचा झेंडा बाजूला ठेऊन आम्ही सहभागी होऊ”, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.मात्र, असे असले तरीही भाजप आणि संभाजीराजेंमधील वाद आता प्रकर्षाने दिसू लागला आहे. मोदींविषयी नाराजी व्यक्त करून तसेच “मी खासदारकीही सोडायला तयार”, असे विधान केल्याने संभाजीराजे थेट भाजपविरोधी भूमिका घेतायत का ? असा साहजिक प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा

News Desk

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

News Desk

रौप्यपदक मिळवणारे भारताचे पहिले IAS अधिकारी!

News Desk