HW News Marathi
महाराष्ट्र

५० टक्क्याची आरक्षणाची मर्यादाही काढावी लागेल, संभाजीराजेंचा केंद्र सरकारला सल्ला!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर आता केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे एसईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. फक्त १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकात बदल करुन चालणार नाही तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादाही काढावी लागणार असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करुन चालणार नाही तर 50 टक्क्याची आरक्षणाची मर्यादाही काढावी लागणार आहे. तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय असण्याची गरज आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्र बसून या विषयावर चर्चा करण्याची गरज असल्याचं मतही संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

काय आहे १०२ घटनादुरुस्ती?

१०२ व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा अधिकार राहीलेला नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने मराठा आरक्षणाचा निकाल देताना सांगितलं होतं. हा अधिकार आता फक्त राष्ट्रपती, संसद यांच्याकडेच असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलं. पण आता केंद्र सरकार राज्यांना अधिकार बहाल करुन, त्या त्या स्तरावर निर्णय घेण्याचे हक्क देत आहे. त्यासाठी 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येत आहे.

सरकारने याचिका फेटाळली

मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली मोदी सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं 1 जुलैला फेटाळली होती. राज्य सरकारनेही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. मोदी सरकारची याचिका फेटाळली गेल्यामुळे राज्य सरकारनं त्याच विषयाबाबत दाखल केलेली याचिका निकालात निघाल्याचं जाणकारांना वाटतं.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

News Desk

तेलंगणा राज्याप्रमाणे राज्यातील शेतक-यांना मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे 

News Desk